Ad will apear here
Next
रंगसंमेलनात रसिकांसाठी भरगच्च कार्यक्रम
नाना पाटेकरपुणे : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे येथे प्रथमच होणाऱ्या रंगसंमेलनात ‘चतुरंग’ने पुणेकर रसिकांसाठी भरगच्च कार्यक्रम आखले आहेत.

सॅक्सोफोन आणि बासरीच्या ‘नाद नभांगणी नाचतो’ या वादनजुगलबंदीने रंगसंमेलनाला सुरुवात होणार आहे. विद्वान पं. कद्री गोपालनाथ आणि पं. रोणू मजुमदार यांच्या या ‘वादनारंगा’ला पं. अरविंद आझाद (तबला) आणि बी. विजया नटेशन् (मृदुंगम) यांची साथसंगत लाभणार आहे. कविवर्य ग. दि. माडगुळकर आणि गायक सुधीर फडके यांनी अजरामर केलेल्या गीतरामायणाला नृत्यसाज चढवून नृत्यांगना सोनिया परचुरे, नकुल घाणेकरसह ४० नृत्यकलावंत ‘नृत्यस्वरूप गीतरामायण’ सादर करणार आहेत.

नाना पाटेकर, सुमित राघवन, सतीश राजवाडे, इरावती हर्षे यांच्यासह सुधीर गाडगीळ यांचा गप्पांचा कार्यक्रम रंगणार आहे. डॉ. गिरीश ओक, लीना भागवत आणि योगेश सोमण हे ‘नाट्यरंग’ हा कार्यक्रम सादर करतील. ‘ज्ञानरंग’मध्ये डॉ. रघुनाथ माशेलकरांची मुलाखत ‘जडण-घडण’चे संपादक डॉ. सागर देशपांडे घेणार आहेत. ‘स्नेहरंग’मध्ये उपस्थित रसिकांना रंगसंमेलनात सहभागी झालेल्या कलावंत आणि मान्यवरांसह चहापानाची संधी मिळणार आहे.  

याच दरम्यान व्यंगचित्रकार विकास सबनीस, शिल्पकार डॉ. मुकुंद राईलकर आणि चित्रकार अरूण दाभोळकर यांच्या प्रात्यक्षिकांचाही आनंद रसिकांना घेता येणार आहे. या वेळी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. रंगसंमेलनाचे स्वागताध्यक्षपद अभिनेते मोहन जोशी भूषवणार आहेत. या प्रसंगी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यासोबत डॉ. अरविंद जामखेडकर, डॉ. विनय सहस्रबुद्धे, विजय कुवळेकर, डॉ. सर्जेराव ठोंबरे, डॉ. सागर देशपांडे, डॉ. विणा देव उपस्थित राहणार आहेत.
मोहन जोशी
या रंगसंमेलनाचे उद्घाटन पुणेकर कलाकारांच्या हस्ते अभिनव पद्धतीने केले जाणार आहे. यामध्ये दिलीप प्रभावळकर, आशा काळे-नाईक, रोहिणी हट्टंगडी, मोहन जोशी, रवींद्र साठे, सुहास बहुळकर, सुधीर गाडगीळ, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, मिलिंद फाटक, मृणाल कुलकर्णी, सावनी शेंडे-साठे, योगेश सोमण, गिरीश कुलकर्णी, मुग्धा गोडबोले, निपुण धर्माधिकारी, ओम भूतकर, प्रवीण तरडे, मानसी मागीकर, राहुल सोलापूरकर, उदय टिकेकर, शार्वरी जमेनीस, शशांक केतकर, अलोक राजवाडे, विभावरी देशपांडे, रवीमुकुल, आरोह वेलणकर यांचा समावेश आहे. या संमेलनाचे सूत्रसंचालन सुनील बर्वे करणार आहेत. रंगसंमेलनाची सांगता ‘गानरंगा’ने होणार आहे.  

उद्घाटनाविषयी :
दिवस : १६ व १७ डिसेंबर २०१७
वेळ : सायंकाळी चार ते रात्री १०
स्थळ : गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे

प्रवेशिकेसाठी : www.ticketees.com

संपर्क :

वरदा : ७०३०२ ५५००४
अमेय : ८३२९४ ५२५४३
बाळा : ७७०९५ ३३३३५
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZOJBI
Similar Posts
‘चतुरंग’चे ‘रंगसंमेलन’ प्रथमच पुण्यात पुणे : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे होणाऱ्या ‘रंगसंमेलना’चे यावर्षी प्रथमच पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. आजवरच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीत २२ वेळा मुंबईत आणि तीन वेळा गोव्यात झालेल्या रंगसंमेलन सोहळ्यात लता मंगेशकर, पु. ल. देशपांडे, सुधीर फडके, बाबासाहेब पुरंदरे, डॉ. नारळीकर, डॉ. भटकर, साधना आमटे, पांडुरंगशास्त्री आठवले, डॉ
डॉ. देगलूरकर यांना ‘चतुरंग’चा ‘जीवनगौरव २०१७’ पुणे : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या डॉ. गो. बं. देगलूरकर यांना जाहीर झाला. तीन लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चतुरंग प्रतिष्ठानच्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या ‘रंगसंमेलन २०१७’मध्ये डॉ. देगलूरकर यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल
‘चतुरंग’च्या ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ला प्रतिसाद पुणे : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यात अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांत मोठ्या मेळाव्याची लिम्का बुकमध्ये नोंद पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुण्यात झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या स्नेहमेळाव्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. ‘रिज्युव्हिनेट बाय सीनिऑरिटी’ या संकल्पनेवर आधारित या मेळाव्यात तीनशे ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language